Search This Blog

Tuesday, November 20, 2018

लघुकथा २-भेट



ती: आठवते तुला, आपली पहिली भेट ?

तो: नाही बुवा....

ती : हेच, तुझं मला आवडत नाही...कसा रे तू असा...

तो : अरेच्च्या....कमाल आहे...आपण "पहिल्यांदा" असे कधी भेटलो ??? आपण "भेटलो" कारण त्या आधीपासून  आपण "आपण" होतो !!!

ती : तू अजून तस्साच आहेस !! 

तो: म्हणजे नक्की कसा ?

ती: "आपण" पहिल्यांदा भेटलो होतो...अगदी तसा !

दोघे: :) :) :)................:) :) :)

- नेहा लिमये
(पूर्वप्रसिद्धी - "नुक्कड" फेसबुक पेज द्वारा बुकहंगामा. com )


No comments: