Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८९ - वानवा


वानवा
अमुक एका गोष्टीची वानवा असणे म्हणजे ती गोष्ट अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध असणे अथवा उपलब्धच नसणे.


उदा. आजकाल शिक्षणक्षेत्रात तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांची वानवा दिसून येते.

हा वानवा शब्द वा न वा असा तीन शब्दांचा मिळून बनलेला आहे. दाता भवति वा न वा असे एक संस्कृत वाक्य आहे. त्याचा शब्दश: अर्थ असा – दान करणारा (दाता) असतो (भवति) किंवा (वा) असत नाही (न भवति)! आणि पुढचा वा ‘किंवा’ याच अर्थाचा, पण वाक्याला जरा जोर येण्यासाठी. म्हणजे – किंवा नसतोच हो! दाता नसतोच!

‘वा न वा'ने हा अभावच जरा अधिक स्पष्टपणे व्यक्त होतो.

- नेहा लिमये



No comments: