Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९५ -विदग्ध

विदग्ध
विदग्ध = वि (उपसर्ग) + दह् (धातु) + क्त (प्रत्यय)
दह् म्हणजे दहन करणे, जाळणे, भाजणे.
ज्याने आपले अज्ञान पूर्णपणे जाळून टाकले आहे अशी बुद्धिमान आणि बहुश्रुत व्यक्ती.
विदग्ध काव्य/साहित्य-रसिक म्हणजे साहित्यशास्त्राचे ज्ञान असलेला आणि म्हणूनच काव्यातील चांगले/ वाईट काय हेे सांगू शकणारा , उत्तम टीकाकार असा विद्वान काव्य-साहित्य-रसज्ञ.
विदग्ध वाङ्‌मय / विदग्ध साहित्य
अगदी ढोबळ मानाने सांगायचे झाले तर एखादा खाद्य पदार्थ कच्चा खाण्याऐवजी तव्यावर भाजण्याचा संस्कार करून आपण तो चविष्टपणे खातो. ही भाजण्याची प्रक्रिया ज्याप्रमाणे खाद्यपदार्थात विशेष रसपूर्णता आणते, तसेच साहित्यातही शब्दार्थांवर एक विशेष भाजण्याची म्हणजे त्यांना अधिक चविष्ट बनविण्याची प्रक्रिया केली जात असते. हे भाजणे अर्थातच लाक्षणिक असते. या अर्थाने विदग्ध वाङ्‌मय म्हणजे अभिजात वाङ्मय.चतुर, कलापूर्ण, नागर, सुसंस्कृत असे विविध अर्थ विदग्ध या संज्ञेने सुचविले जातात. कलात्मकतेबरोबरच उच्च अभिरुचीची निदर्शक अशी ही संज्ञा आहे.
- नेहा लिमये

No comments: