Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८८- वाममार्ग


वाममार्ग

डाव्या-उजव्या हातांसाठी वाम आणि दक्षिण हस्त असे शब्द आहेत. दक्षिण म्हणजे चांगला, तत्पर वगैरे अर्थ सिद्ध झाल्यामुळे त्याच्या विरोधात वाम म्हणजे वाईट, ताज्य असे अर्थ भाषेत रूढ झाले. त्या दृष्टीने वाम मार्ग म्हणजे वाईट वर्तनाचे मार्ग. परंतु त्या खेरीजही एका वेगळ्या कारणासाठी ‘वाम’ मार्ग म्हणजे त्याज्य वर्तन असे समजले जाते.


मद्य, मांस, मत्स्य, मैथुन आणि मुद्रा या पंच ‘म’कारांचा मार्ग स्वीकारून उपासना करणारा तांत्रिकांचा एक पंथ होता. हे तंत्र-मार्गी आपल्या धार्मिक पूजा-अर्चा स्वरूपाच्या कृत्यांमधील कर्मे करताना ती डाव्या (वाम) हाताने करीत. म्हणून त्यांच्या मार्गाला (पंथाला) वाममार्ग म्हटले जाई. आज हा तंत्र-पंथ किंवा तंत्र-मार्ग फारसा प्रचारात राहिलेला नसला, तरीही कोणत्याही दुष्कृत्याला ‘वाम’ म्हणजे वाईट असेच म्हणण्याची प्रथा पडलेली आहे.

- नेहा लिमये

(संदर्भ: शब्द चर्चा - मनोहर कुलकर्णी)

श्री. अरुण फडके सरांनी दिलेली माहिती :-


डावखुर्‍या सर्वच व्यक्ती 'वाममार्गी' नसतात हे नशीब म्हणायचं! (गंमत!). जसा 'डावखुरा' हा शब्द आहे, तसा 'उजखुरा' शब्दही आहे हे सर्वांना माहीत नसतं. त्याचप्रमाणे जशी कन्या 'उपवर' होते, तसा पुत्र 'उपवधू' होतो.


No comments: