Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८५- सामोपचार


सामोपचार


कुठल्याही संघर्षकारक परिस्थितीत एकदम हातघाईवर न येता प्रथम सामोपचारानेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे एक समाजमान्य तत्त्व आहे. पण सामोपचार म्हणजे नेमके काय?


साम, दाम, भेद, दंड असे चतुर्विध उपाय आहेत, त्यातही साम हाच पहिला उपाय आहे. या सामाचा उपचार, म्हणजेच आचार, म्हणजे सामोपचार!

यज्ञप्रसंगी वैदिक ऋचांचे गायन करीत असत. या गायन प्रकाराला साम म्हणत. या सामामुळे देवता संतुष्ट होतात, अशी श्रद्धा असे. अशा गायनयोग्य मंत्रांचा संग्रह सामवेद या नावानेच प्रसिद्ध आहे. स्तुतीने संतुष्ट करण्याचा हा उपचार म्हणजे साम-उपचार अर्थात सामोपचार.


संस्कृत शब्दकोशात 'साम'चा अर्थ गायन, स्तुती करणे असा दिला आहे. 'सम्'शी साधर्म्य नाही.

एखाद्याकडून काही करून घ्यावयाचे असल्यास त्याची स्तुती करून , आपल्या मनासारखे करुन घेणे, याला 'साम' उपचार / पद्धती असे म्हणतात.


सामोपचार आणि समजावून सांगणे यात धूसर रेषा आहे. सामोपचारात समोरची व्यक्ती कशाने नमेल(समजून घेईल) याचा विचार करून बोलणे आणि त्यासाठी लागल्यास, स्तुती करणे असे अभिप्रेत आहे.

समजावून सांगण्यात स्तुती येईलच असे नाही.
-नेहा लिमये

No comments: