लिहायला शिकताना पूर्वी धूळपाटीवर अक्षरे गिरविण्यास शिकवत असत. माझेही लिखाणाचे प्रयत्न असेच काहीसे - धुळाक्षरे गिरवण्याचे, पुन्हापुन्हा स्वतःला त्यातून शोधण्याचे आणि हा शोध असाच चालू ठेवण्याचे. लघुकथा, कविता, लेख, पत्रमालिका याबरोबरच #मराठीभाषा हा माझा फेसबुकवरील उपक्रम सुद्धा "धुळाक्षरी"चा भाग आहे. या निमित्ताने इकडे-तिकडे गिरवलेले एका ठिकाणी संग्रहीत करण्याचा हा प्रयत्न. - नेहा लिमये