Search This Blog

Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Thursday, November 29, 2018

क्षण

मनाच्या निर्वात पोकळीत
जपलेले काही क्षण
जेव्हा मुजोर होतात
तेव्हा त्यांना खुशाल
स्वतःच बोट धरून
एक निर्जन बेटावर सोडून यावं

कुणी सांगावं....

देहाच्या सांदी-कोपऱ्यात
एक मिणमिणती पणती
निश्चल उभी असेल
येणाऱ्या क्षणांना
'इथे अजून उजेड आहे'
हे कळण्यासाठी !

- नेहा लिमये

#randomthoughts

Tuesday, November 20, 2018

दर्या

दर्या

निळेशार पाणी, रुपेरी किनारे
शंख शिपल्यांचे, बिलोरी मनोरे

कल्पवृक्ष देती, ऐलतिरा साज 
अवखळ लाटांची, पैलतीरा गाज

नभी रंग रेषा, वारे अन पक्षी 
जळी तरंग मासे, झरे बघ नक्षी

क्षितीज खुणावे, म्हणे चल दूर देशी
सोनेरी बिंब, हळूच जाता लयासी

दूर विहरी नौका, डोले लहरी संगे       
दर्याचा निरोप घेता, आठवणी सांगे   

- नेहा

Wednesday, November 14, 2018

अपूर्ण-पूर्ण

अपूर्ण.......... 

पावसाविना पागोळीचा थेंब… 
ओसाड माळावर बहरलेला हिरवा चाफा… 
लेखणीतून कागदावर टिपलेला शाईचा ओघळ…. 
सहाणेवर उगाळून लेपल्यानंतर मागे उरलेलं चंदन…. 
'आशा' नसलेली 'गुलामअली' ची गझल….. 
कवितेची शेवटची (अव्यक्त) ओळ……………. 
कुंद हवा, बेभान वारा आणि पावसासाठी आसुसलेली मी…………………..

पूर्ण !!!

भर उन्हातलं गुलमोहराच झाड !
पहाटेच्या दवात न्हालेला पारिजात !
तानपुऱ्याच्या गर्भातून उमटलेला षड्ज !
वहीत वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं पिंपळपान !
गंध वेडी बहरलेली रातराणी !
मिट्ट अंधारात देवघरातल्या निरांजनाचा प्रकाश !
समुद्र, सूर्यास्त आणि ‘फक्त’ मी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

- नेहा 

Monday, November 12, 2018

पाऊस

पाऊस

पाऊस आठवांचा, पाऊस साठवांचा
गर्भारल्या रानी, निथळल्या पालवांचा

पाऊस गर्द हिरवा, पाऊस जर्द शिरवा
मेघाळल्या गगनी, रंगलेला गारवा

पाऊस याद ऐशी, पाऊस साद तैशी
ओलेत्या मनी ही, ओलेती भूल कैशी

पाऊस चिंब गाणे, पाऊस ओले तराणे
भिजलेल्या ओळी, अन दाटलेले बहाणे

पाऊस गंध माती, पाऊस छंद सोबती
दरवळत्या अंगणी, ओथंबलेली पाती

पाऊस बोल बरवा, पाऊस अबोल हळवा
अंकुरल्या बीजाचा, सोसलेला रुजवा

- नेहा लिमये

तू

तू

ही पहाट जेव्हा धुक्यात लय सावरते
मी रातराणीच्या गंधात तुला पांघरते

तो रावा बोलतो डौलात सोन सकाळी
स्पंदने तुझी ऐकते पारिजात ओंजळी

ही दुपार सरता सावल्या दाराशी येती
सय तुझी दाटता पाने उगा सळसळती

ती सांज उरी घेऊन कातरतो पुरीया
मी लावते दिवा संपवून तुझा जोगिया

मग येते रात्र ती उधळण्या नक्षत्र चांदण्या
अखेर भेटण्या तुला मी मिटून घेते पापण्या

-नेहा (संगीता)

Wednesday, October 31, 2018

साउली

मोरपीस मन
मनाचं कोंदण 
राधेचा श्याम 
जन्माचं गोंदण
गोंदणात श्याम 
श्यामरंग ल्याली 
सावळ्या सख्याची 
राधिका "साउली"
-नेहा लिमये 

तू

तू

ही पहाट जेव्हा धुक्यात लय सावरते
मी रातराणीच्या गंधात तुला पांघरते

तो रावा बोलतो डौलात सोन सकाळी
स्पंदने तुझी ऐकते पारिजात ओंजळी

ही दुपार सरता सावल्या दाराशी येती
सय तुझी दाटता पाने उगा सळसळती

ती सांज उरी घेऊन कातरतो पुरीया
मी लावते दिवा संपवून तुझा जोगिया

मग येते रात्र ती उधळण्या नक्षत्र चांदण्या
अखेर भेटण्या तुला मी मिटून घेते पापण्या

-नेहा लिमये 

तो

तो


तो हसता हसता ऐकवून जातो विराणी
अन् उठते खळीतून कळ ती जीवघेणी

तो म्हणतो मी आहे असा काहीसा वेडा
कुणी सांगा त्याला धुंदीतच वाढे केवडा

तो गुणगुणतो स्वतःशी अंधाराची गीते
मग कुठूनशी ती किरण शलाका येते ?

तो चाळतो जुन्या स्मरणांची पिंपळपाने
शाई झरते, विरते ,उरते जागवून स्वप्ने 

तो नाही म्हणतो करावयाचा अट्टाहास
का तरीही लागे मागे अश्रुंचा वनवास

तो जगतो ऊराशी घेऊन अवकाशाला
जरी जाई झेप ओलांडून या क्षितिजाला

- नेहा लिमये 

चैत्र-पालवी

मधुमास खुणावे आता
मिटले शिशिर शहारे
पक्ष्यांनी गुंफल्या माळा 
शोधाया पुन्हा सहारे (किनारे?)

ती वाट धुक्याची सरली
सरले दुःखाचे कोहरे
त्या चैत्र-पालवी संगे
आनंदी बीज अंकुरे

- नेहा लिमये 

निःशब्द

निःशब्द

तुला ऐकल्यानंतर मागे काही उरत नाही....

शब्द, अर्थ, भाषा, विरामचिन्हे..

सगळ्या पाशातून मुक्त आहेस तू

का, कधी, कुठे, केव्हाच्या पल्याड...

तुझा आभास उरतो फक्त

वाळूत पावल उमटत जातात

वाळू पावलांना लागते पण ....

पण पाऊलवाट नाही  होत त्याची...

म्हणून तर मी रोज येते

तुझी गाज ऐकायला ....

अनिमिषपणे पाहत रहाते... 

मागे उरलेली निःशब्द शांतता........ ! ! !



- नेहा लिमये 

गर्द

गर्द 

गर्द राईतून जर्द केशरी खुणावतो केवडा
मंद सरींवर छंद गुलाबी सुचतो मनकवडा

अभ्र नभावर शुभ्र पांढरी झालर जलदांची
दर्भ तृणावर गर्भ रेशमी पाखर सुमनांची 

आर्द्र सुरावट मंद्र पावरी घुमते तरुतळी 
सांद्र सभोती चंद्र सावरी खुलते  चाफेकळी 

- नेहा लिमये 

आहट

सरसराती हुई ये वादीयां 
जब तुम्हारा जिक्र करती हैं 

बारीश की बुंदोमें 
मैं तुम्हे खोजने लगती हूँ......

एक धुंदलासा कोई पत्ता
मेरी मून्द आंखोंको दिखता हैं

नमी सी आ जाती है आवाजमे
जब वो कहता है
हां, मैने देखा है उसे 
तुम्हारा नाम लेते हुए....

थरथराती हुई मेरी तनहाई
तब  सांस लेती है 

तुम्हारा खयाल ही तो है बस जहन में
और क्या कहूँ............

बस युंही...
तुम्हारी आहट की आदतसी हो गयी है अब

- नेहा लिमये 

Tuesday, October 30, 2018

खयाल



युंही कभी आया करो खयालोमें

खयाल जो तुम्हारे मेरे बीच का
फासला तय करना चाहते है

फासले जो सुबह की अंगडाईसे परे
और शाम की तनहाईसे वास्ता रखते है

तनहाई से याद आया.....
क्या अब भी तुम आंखोपर
किताब रखकर सोते हो ?

किताब जिसमे मैने कभी दिया हुआ
पीपल का पत्ता हुआ करता था

किताब के पंने कितनेही बेतरतीब क्यू न हो
उस पत्ते का खयाल रखना...
और युंही कभी खयालोमे आते रहना !

- नेहा लिमये 

दायरा

आँखोसे मुझे तकते हुए
तुम जो तलाशते हो खुदको
एक दायरा बन जाता है
तुम्हारे मेरे दरमियान

आँखे नम सी फिर और
वो  पिघलता हुआ मंजर
दायरेसे निकलता वो लमहा
कहीं थम जाये बस

मैं वो लमहा जी लू
दामन मे बटोर लू 
फिर लौट जाऊं
वही पुरानी भीड में
खुदको तुम्हारे पास छोड कर

मैं नही जानती
इस रिशते के मायने
ना कोई जूस्तजू है मुझे
ना ही कोई आरजू...
मैं तुम हूँ 
तुम मैं हो
बस , इतना काफी हैं जीने के लिये !

- नेहा लिमये 

सल

सल

सल काही संपत नाही
पीळ काही सुटत नाही

काळ काही सरत नाही
मन काही ऐकत नाही

वेळ काही थांबत नाही
कुणी काही सांगत नाही

बीज काही रुजत नाही
काटा काही फुलत नाही

आज काही कळत नाही
उद्या काही वळत नाही

नाही काही मागणे नाही
आणि काही सांगणे नाही

जन्म काही सोसत नाही
मरण काही मिळत नाही


-नेहा लिमये

Saturday, October 27, 2018

राधा के गिरीधारी

🌼 राधा के गिरीधारी 🌼
मनमोहन मनभावन नाचे कुंज बिहारी I
सबके छीन लूट लियो राधा के गिरिधारी II
कहत गोपी मधुबनमे नंदलाल आयो I
बरखा बन राधे-श्याम घुमड घटा छायो II
रंग गयी चुनर और मगन भयो ब्रिजलाल I
संग भई ब्रिजबाला किशन होय मोहजाल ।।
मची धूम खेल होरी सब गोप वृन्दावनमे I
कहत झूम राधा श्याम बसे कण-कणमे II
- नेहा लिमये 

रुबरू

ख्वाबोका एक काफ़िला
कभी मैनेभी सरमाया था
बंद मुठ्ठीमे रेत लेकर
वक्तके हांथो थमाया था

सुनेपनमें एक चिराग
कभी मैनेभी जलाया था
दबीसी एक सांस को
खुली हवासे मिलाया था

दुवाओंका एक मंजर
कभी मैनेभी बनाया था
गुजरे हुए एक लमहेको
कलके यकीनसे मिलाया था

मेरा न था जो कुछ वो
कभी मैनेभी अपनाया था
खुलीसी एक किताबको
दिलकी स्याहीसे सजाया था

गिला ना था कभी किसीसे
कभी मैनेभी ये बताया था
आईनेसे रुबरू होकर फिर
जिंदगीका गीत गाया था

- नेहा लिमये 

Thursday, October 25, 2018

रे मना............

रे मना............

ऐकशील का एवढे ?
सतत "अहं"चे पोवाडे
नसलेल्या जखमांचे कण्हणे
पर दुखः शीतल
आणि "स्व" चे रडगाणे 

बाकी जनांचा उपहास
भावनांचा परिहास
आणि फक्त
"मी" चा अट्टाहास

"माझ्या" आकांक्षा, इच्छा
"माझे" मान - अपमान
"माझाच" शब्द
आणि "माझीच" सत्ता 

कधी संपवशील सारे
आणि सोडशील दुराग्रह
"माझेच खरे" करण्याचा

ऐकशील का एवढे
तुझ्या संवेदना वेदनांत बदलण्याआधी ?
तुझ्या अवकाशात अंधाराने घर करण्याआधी?
बाकीच्यांना संपवताना
तुझाही "स्व" संपण्याआधी ????


ऐकशील का एवढे ...................

- नेहा लिमये