गर्द
गर्द राईतून जर्द केशरी खुणावतो केवडा
मंद सरींवर छंद गुलाबी सुचतो मनकवडा
अभ्र नभावर शुभ्र पांढरी झालर जलदांची
दर्भ तृणावर गर्भ रेशमी पाखर सुमनांची
आर्द्र सुरावट मंद्र पावरी घुमते तरुतळी
सांद्र सभोती चंद्र सावरी खुलते चाफेकळी
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment