शुद्धलेखन नियम :- शब्दाचा शेवट "सा" ने होत
असल्यास सामान्यरूपाच्या वेळी "शा" होते.
महामंडळाचा नियम -8.4 --पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ' सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही).
तात्पर्य - सा-कारान्त पुल्लिंगी शब्दांची एकवचनी आणि अनेकवचनी सामान्यरूपे केवळ शा-कारान्त करावीत, श्या-कारान्त करू नयेत.
अपवाद - नकाशा.
त्याचप्रमाणे शी-कारान्त स्त्रीलिंगी नामांची अनेकवचनेही श्या-कारान्त करावीत.
जसे - घसा- घशात, मासा - माशाचा, ससा-
सशाने
यात "शा" होतो, "श्या" होत नाही हे लक्षात घ्यायला हवे. सश्यांचा, माश्यांचा हे चुकते.
अपवाद - आदिवासी - आदिवासींच्या, आदिवासीने
मात्र शा-कारान्त पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे श्या-कारान्त करावीत.
उदा. - ठुशी - ठुश्यांचा
-नेहा लिमये
(संदर्भ : मार्गप्रदीप - अरुण फडके )
No comments:
Post a Comment