Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा २- ज्ञ

ज्ञ = जाणणारा
उदा. सुज्ञ, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, विशेषज्ञ, अनभिज्ञ.

परंतु, एखाद्या विषयातील पारंगत व्यक्तीसाठी "तज्ज्ञ" लिहावे, "तज्ञ" नाही - उदा. रोगतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, लेखनतज्ज्ञ, इत्यादी.

ज् + ञ + अ = ज्ञ

तद् + ज् + ञ = तद् + ज्ञ = तज्ज्ञ

द् ह्या व्यंजनापुढे ज् हे व्यंजन आल्यास द्-बद्दल ज् होतो.

तद् = प्रसिद्ध, अनुभवलेले
ज्ञ = ज्ञानी, विद्वान.

एखाद्या विषयाचे ज्ञान असणारा हा त्या विषयातील तज्ज्ञ.
परंतु त्या विषयाचे नाव लिहिल्यास पुढे ज्ञ किंवा तज्ज्ञ यांपैकी एक लावावे.
उदा - गणितज्ञ किंवा गणिततज्ज्ञ दोन्ही योग्य परंतु गणितज्ज्ञ चुकीचे.

सुज्ञ  -- सु हा उपसर्ग आहे.
जसे सुप्रसिद्ध, सुशिक्षित तसे सुज्ञ = जाणता, उत्तम ज्ञान असलेला.

- नेहा लिमये

No comments: