Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ३- स्थितप्रज्ञ


स्थितप्रज्ञ = ज्याची बुद्धी (प्रज्ञा) स्थिर (स्थित) आहे असा, सर्व विकारांपासून मुक्त असा.

भगवद्गीतेत, ज्ञानेश्वरीमध्ये आणि विनोबांच्या गीताईत स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सविस्तर सांगितली आहेत. अशी व्यक्ती मुक्ती / मोक्षप्राप्तीच्या मार्गाला योग्य ठरते असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

दैनंदिन व्यवहारात - एखाद्या वादविवादाचा आपल्या निर्णयावर / विचारांवर परिणाम न होऊ देणारा किंवा त्यापासून अलिप्त राहण्याचे कसब साधलेला, असाही अर्थ होतो.

- नेहा लिमये

No comments: