तारतम्य बाळगणे
तरतमभाव - पात्रापात्रभाव. सरस-नीरस यांतील फरक.
तारतम - अतिथी सत्कार
"बोलताना काही तारतम्य बाळगशील की वाट्टेल ते बोलत सुटशील?" असे आपण नेहेमीच ऐकतो.
यातील "तारतम्य" हा शब्द "तर" आणि '"तम" यावरून आला आहे. "तर-तम" हे कमी-अधिक दर्शवतात.
यावरून चांगल्या-वाईटाचा, कमी-अधिक असण्याचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून बोलणे किंवा वागणे.
- नेहा लिमये
(संदर्भ: शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी आणि विस्तारित शब्दरत्नाकर)
No comments:
Post a Comment