Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ७- मराठी पत्रव्यवहार

आज मराठी पत्रव्यवहारातल्या मजकुराबद्दल जाणून घेऊ-

सा. न. - साष्टांग नमस्कार

स. न. - सप्रेम नमस्कार


शि. सा. न.- शिर साष्टांग नमस्कार


कृ. शि. सा. न. - कृतानेक (कृत =केले + अनेक = पुष्कळ केलेले) शिर साष्टांग नमस्कार


वि. वि. - विनंती विशेष


थो. न. ल. आ. - थोरांना नमस्कार लहानांना आशीर्वाद


क. लो. अ. - कळावे लोभ असावा


गं. भा. म्हणजे गंगा भागीरथी

यात साष्टांग = सह + अष्ट + अंग = आठ अंगांनी मिळून घातलेला नमस्कार.
१. छाती, २. शिर (डोके), ३. दृष्टी (डोळ्यांनी नमस्कार करणे), ४. मन (मनाने नमस्कार करणे), ५. वाचा (‘तोंडाने’ नमस्कार असे म्हणणे), ६. पाय, ७. हात आणि ८. जानु (गुडघे), भूमीला टेकवून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार. ‘याप्रमाणे केल्या जाणार्‍या नमस्काराला ‘विधीवत नमस्कार’ असे म्हणतात. यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक पद्धतीने देवतांना शरण येऊन त्यांना आवाहन केले जाते.

- नेहा लिमये

No comments: