Search This Blog

Thursday, October 25, 2018

#मराठी भाषा २६ - सव्यापसव्य

सव्यापसव्य करणे/ होणे = खटपट/ यातायात करावी लागणे

दशक्रिया विधीच्या वेळी जानवे/ उपरणे डावीकडून उजवीकडे करावयास सांगतात. जानवे/उपरणे डाव्या खांद्यावरुन उजव्या बगलेखालून काढणे म्हणजे 'सव्य' आणि उजव्या खांद्यावरुन डाव्या बगलेखालून काढणे म्हणजे 'अपसव्य'. ही कृती अनेकदा करायला लागली की कंटाळवाणी होते.

तसेच एखादी योजना बदलून आधी ठरवल्याच्या उलट करावे लागणे आणि काही काळाने तेही बदलून पूर्वपदावर यावे लागणे म्हणजेच एखादी योजना तडीस नेण्यासाठी खूप यातायात/ खटपट करावी लागणे या अर्थी 'सव्यापसव्य' शब्द वापरतात.

- नेहा लिमये 

(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी , मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी )

No comments: