Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा १३- द्वेष्टा/ द्रष्टा


द्वेष्टा = विरोधात बोलणारा/ वागणारा, शत्रुभाव बाळगणारा, मत्सरी
जसे - धर्म द्वेष्टा, स्त्री- द्वेष्टा

द्रष्टा = (सत्य स्थिती) पाहणारा, साक्षी, भविष्यस्थिती आजमावून वर्तमानात वागणारा/ बोलणारा
जसे - द्रष्टा नेता, द्रष्टा गुरू

द्रष्टा म्हणजे भविष्याचे पूर्व आकलन असणारा किंवा भविष्याची जाणीव असणारा असे म्हणता येईल.

द्रष्टव्य - पाहण्यास योग्य, द्रष्टा - पाहणारा (विस्तारित शब्दरत्नाकर)

द्वेष्टा या शब्दाच्या अर्थामध्ये द्वेषभाव या अर्थाचाही उल्लेख असावा असे वाटते. द्वेष, मत्सर, शत्रुभाव यामध्ये पुसट सीमारेषा असणा-या भावनांची सरमिसळ आहे. 

-नेहा लिमये

No comments: