हतबुद्ध होणे
हत म्हणजे आघात झालेली/ जवळ जवळ नष्ट झालेली.
हतबुद्ध = ज्याची बुद्धी म्हणजे विचार करण्याची शक्ती नष्ट झाली आहे असा.
हतबुद्ध होणे = एखाद्या परिस्थितीवर किंवा संकटावर काहीही उपाय न सुचल्याने निराश होणे
असेच-
हतोत्साह = ज्याचा उत्साह नाहीसा झाला आहे असा
हतवीर्य = ज्याचे शौर्य नाहीसे झाले आहे असा
- नेहा लिमये
(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी )
1 comment:
हतविर्य हा शब्दप्रयोग पुरूषाबाबत केला जातो आणि हतबुद्ध हा स्त्रीविषयक केला जातो ..हे खरे आहे का?
Post a Comment