Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ६ -इकार आणि उकार


मराठी शब्दांच्या शेवटी येणारा इ-कार आणि उ-कार दीर्घ उच्चारला जातो, म्हणून दीर्घ लिहावा.

जसे - वाटी, दाढी, पिशवी, आगगाडी, चेंडू, दांडू, वाळू, करू

अपवाद-
१/ "आणि" नेहमी ऱ्हस्व लिहावा, "आणी" लिहू नये.
२/ तत्सम अव्यये (संस्कृतमधून जशीच्या तशी आलेली) मूळ रूपातच लिहावीत - परंतु, तथापि, अति, किंतु, इति, कदापि, अद्यापि वगैरे

अपवादाला अपवाद- 😀

"आदी" आणि "इत्यादी" अव्यये दीर्घच लिहावी.

अद्याप'ही' , तरी'ही' यातले 'ही' सुद्धा दीर्घच लिहावे.

आदि -- उपसर्ग असेल तर -हस्व लिहावा. उदाहरणार्थ- आदिवासी


- नेहा लिमये

No comments: