Search This Blog

Tuesday, November 20, 2018

दर्या

दर्या

निळेशार पाणी, रुपेरी किनारे
शंख शिपल्यांचे, बिलोरी मनोरे

कल्पवृक्ष देती, ऐलतिरा साज 
अवखळ लाटांची, पैलतीरा गाज

नभी रंग रेषा, वारे अन पक्षी 
जळी तरंग मासे, झरे बघ नक्षी

क्षितीज खुणावे, म्हणे चल दूर देशी
सोनेरी बिंब, हळूच जाता लयासी

दूर विहरी नौका, डोले लहरी संगे       
दर्याचा निरोप घेता, आठवणी सांगे   

- नेहा

No comments: