Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९०- वार्तापत्र / वृत्तपत्र

वार्तापत्र / वृत्तपत्र

वार्ता म्हणजे वृत्त! म्हणजे बातमी. अशीच आपली समजून असते ना? वार्ता आणि वृत्त हे दोनही शब्द वृत्-वर्तते म्हणजे असणे, घडणे या अर्थाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेले आहेत. मात्र त्यांच्या अर्थात सूक्ष्म भेद आहे.

आकाशवाणीवर वाचले जाणारे वार्तापत्र असते; वृत्तपत्र नसते किंवा वार्ताहर संपादकांकडे पाठवितात तेही वार्तापत्र असते. त्यात वर्तमानकाल प्रतिबिंबित होत असतो. व्हायला हवा.

‘वृत्त’ म्हणजे मात्र जे घडले आहे ते. त्यात नजीकचा भूतकाळ येतो. घडलेल्यावर शिक्कामोर्तब होते. वृत्तपत्रात ते होते.

वार्ता म्हणजे घडत असलेली गोष्ट, तर वृत्त म्हणजे घडलेली गोष्ट. म्हणून वार्ता गोळा करण्याचे काम अव्याहत केले जात असते.

वार्तापत्र आणि वृत्तपत्र या दोन शब्दांच्या अर्थातला भेद लक्षात घ्यायला हवा.


स्वप्नील सुर्वे या वाचक मित्राने दिलेले योग्य उदाहरण -

आपण बोलताना कधी कधी बोलतो समोरच्याला......"अरे, काय वार्ता करतोस?" तर दुरचित्रवाणी वरील एखादी निवेदिका म्हणते," आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार" हां दोहोंमधला फरक...

- नेहा लिमये


No comments: