Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा १०० - योजना, आयोजन, नियोजन, संयोजन


योजना, आयोजन, नियोजन, संयोजन


युज् या संस्कृत धातुपासून 'योजणे' हा शब्द तयार झाला.

योजणे = निश्चित करणे, नेमणे, जोडणे, संकल्प करणे, व्यवस्था करणे [to fix/ arrange]

योजना = कल्पना, संकल्प, युक्ती, नेमणूक [plan]

योजनापूर्वक= विचार करून ठरविलेले

योजनाबद्ध= माहिती आणि आकडे यांच्या आधारे संकल्पिलेला (आर्थिक कार्यक्रम वगैरे)

आयोजन = आ+ युज् (योजन)= योजना आखणे [planning]

संयोजन = सम् + युज् (योजन) = जोडणे, सांधणे, एकत्र करणे [coordination]

नियोजन = नि + युज् (योजन) = नेमणे, ठरविणे, अर्थ किंवा इतर विषयात योजनाबद्ध उपक्रम करणे [decision making and/or execution of plan]

- नेहा लिमये

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ. पां. कुलकर्णी आणि विस्तारित शब्दरत्नाकर - वा. गो. आपटे)

टीप: मी शक्यतो इंग्रजी शब्दांचा वापर टाळते परंतु आयोजन, नियोजन, संयोजन या शब्दातला फरक मला इंग्रजी शब्दांच्या आधारे विचारला गेला म्हणून ते इंग्रजी शब्द इथे उल्लेखिणे आवश्यक वाटले. क्षमस्व.


No comments: