Search This Blog

Monday, November 12, 2018

पाऊस

पाऊस.......हा शब्द जरी नुसता उच्चारला तरी नजरेसमोर कितीतरी गोष्टी उभ्या राहतात नाही. म्हणजे, छत्री आणि शबनमची कसरत करत रस्ता cross करणारे काका, दप्तराची ओझी आणि raincoat मध्ये "लपलेले" चिमणे जीव, traffic चा "गुंता" सोडवण्यात "गुंतलेले" police मामा, डोक्यावर पुस्तक धरून बसला लोंबकळणारे तरुण, चिखलात रुतून बसलेली गाडी, खमंग वास दरवळत ठेवणाऱ्या गरम गरमवडापाव आणि भजीच्या गाड्या, white  wash केल्यासारखे दिसणारे रस्ते आणि दुतर्फी झाडांची वस्ती..........किती म्हणून दृश्य आठवावी ! 

पण त्यातलं एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिलं.....मी अशीच एक दिवस ऑफिसला जात होते. वेळ सकाळी १०-१०.३० ची असेल.....बेताचा पाऊस होता..म्हणजे पुढचं नीट दिसण्याएवढा. तरीही नेहेमीप्रमाणे traffic अडून बसलेलं. बराच वेळ गाडी हलण्याची चिन्ह दिसेनात म्हणून मी बाहेर नजर टाकली. तर रस्त्याच्या कडेला २ पोरं खेळत होती. पाण्याच्या डबक्यात काठ्या मारण्याचा खेळ. लहानपणी खेळलेला. त्यात जो मोठा मुलगा होता तो छोट्याला काठी किती जोरात मारली कि कशी पाण्याची लांबच्या लांब पिचकारी उडते ते दाखवत होता. छोटा त्याचं अनुकरण करत पाणी उडवत होता.  मग मोठ्याने त्याच्या दप्तरातून कागदाची नाव काढली. आणि ती त्या डबक्यात सोडली. छोट्याला गम्मत वाटली असावी. तो काठीने त्या नावेला दिशा देऊ लागला. तशी ती नाव गोल गोल फिरायला लागली. मोठा टाळ्या वाजवायला लागला. दोघं मस्त खेळत रमले होते. तितक्यात एक cycle  वाला कुठून तरी उपटला आणि भरधाव वेगाने cycle  चालवत त्या डबक्यातून निघून गेला. मोठ्याने खसकन छोट्याला धरून मागे ओढलं म्हणून बरं....पण या सगळ्यात ती नाव बुडली, त्याची काठी लांबवर फेकली गेली.....छोटा हिरमुसला न त्याने भोकाड पसरलं....मोठा बहुतेक गोंधळला. माझी उत्सुकता ताणली गेली...आता ते दोघे काय करतील? कोण असतील ते? भाऊ का नुसतेच सवंगडी ? तेवढ्यात जोराची सर आली. मोठ्याने छोट्याला ओढत ओढत एका दुकानापाशी नेलं आणि त्या दुकानाच्या छताला लावलेल्या पन्हाळीतून पावसाचं पाणी पडत होतं ते छोट्याच्या अंगावर उडवलं......  छोटा एकदम खुश झाला आणि त्याने परत मोठ्याचा अनुकरण करायला सुरुवात केली. दोघे परत खिदळायला लागले.

तसं म्हणलं तर हा अगदी साधा प्रसंग ....कुठेही बघायला मिळणारा. पण माझ्या मनात लक्ख वीज चमकून गेली. एवढ्या तेवढ्या गोष्टींनी पावसावर राग काढणारे आणि हैराण होणारे आपण.......म्हणजे कामवाली  बाई वेळेवर आली नाही, मीटिंग ला पोचायला उशीर झाला,  ऑफिस मध्ये लक्ष लागत नाहीये इ. इ......काहीही झालं तरी दोष मात्र त्या पावसाचा ! आपण राग काढायला पावसाचं निमित्त शोधतो आणि ही दोन मुलं पावसाचंच निमित्त शोधून एक खेळ मोडला तरी दुसरा शोधून काढतायत. ..त्याची मस्त मजा घेतायत. 

क्षणभर असं मानून चालू कि त्यातला छोटा म्हणजे आपले "problems " आणि मोठा म्हणजे "opportunities ".   एरवी आपण problems  चा पाढा वाचून स्वतःला छोटं करून टाकतो....पण त्याच problems मधून opportunities पण निघू शकतात आणि त्या आपल्याला मोठं करू शकतात. आयुष्यात छोटा आणि मोठा म्हणजेच problems आणि opportunities   दोन्ही आवश्यक आहेत. छोट्या सारखं problems नी खचून जाण साहजिकच आहे...पण मोठ्या सारखं लगेच सावरून एक डाव मोडला तरी दुसरा मांडता येतो इतपत आपल्याकडे positive attitude  हवा.  तरच हे जीवन खूप सुंदर आहे आणि ह्याची खऱ्या अर्थाने मजा लुटता येईल, नाही का?

असाही एक पाऊस असावा कि जो आपल्याकडे बघून थांबायचा विसरेल.  आपल्याला म्हणेल....काय रे मित्रा, कसं काय जमत बुवा तुला सगळं ? मग आपण म्हणू, अरे तू आहेस म्हणूनच तर जग वेगळं दिसतं आणि वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघता येत...त्यामुळे तू ये आणि कोसळत राहा असाच. मग तो हि हसेल आणि परत बरसायला लागेल....

- नेहा लिमये 

No comments: