Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९१ - आमूलाग्र


आमूलाग्र

‘अंतर्गत प्रश्नांचे रूप पाहाता, आता आपले एकूण धोरण आमूलाग्र बदलण्याची आवश्यकता आहे, असे नाही का आपल्याला वाटत?' या वाक्यात आमूलाग्र असा शब्द आलेला आहे.

या शब्दाचे तीन घटक आहेत, आ-मूल-अग्र. मूल हा शब्द मराठीत मूळ असा होऊन आलेला आहे. जमिनीवर झाड उभे असते, त्याचे मूळ जमिनीत असते, ते मूल. अग्र म्हणजे वरचे टोक; झाडाचा शेंडा. ‘आ’ म्हणजे ‘पासून’ आणि ‘पर्यंत'ही. मुळापासून तो शेंड्यापर्यंत, असा अर्थ देणारा हा शब्द आहे – आमूलाग्र. म्हणजे संपूर्ण, एखाद्याच भागाचा विचार न करता समग्रपणे सर्व गोष्टींचा विचार करून.

हा शब्द अमूलाग्र, अमुलाग्र, आमुलाग्र असा लिहिणे चुकीचे आहे.

- नेहा लिमये



1 comment:

Shirish kulkarni, smile said...

खूप उपयुक्त . नेमकं आणि महत्वाचं असं वाचनीय . उत्सुकतेनं खूप वाचून काढलं .ब्लाॅगची गरज होतीच .अभिनंदन आणि धन्यवादही .