Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९६ - वागीश्वरी

वागीश्वरी

‘जय शारदे, वागीश्वरी....’ हे गीत आपण अनेकदा ऐकले असेल. सरस्वती देवीला आवाहन करून तिला वंदन करणारे हे गीत आहे. शारदा हे सरस्वतीचेच एक नाव. तसेच वागीश्वरी हेही एक नाव अथवा तिचे वर्णन करणारे विशेषण आहे.


वागीश्वरी हा शब्द वाक् आणि ईश्वरी या दोन शब्दांचा मिळून तयार झालेला एक सामासिक शब्द आहे. हा समास तयार होताना वाक् मधील ‘क् चे ‘ग्'मधे रूपांतर होते. म्हणून मग वाग्-ईश्वरी असे हे वागीश्वरी रूप आपल्याला मिळते. वाक् म्हणजे वाणी म्हणजेच भाषा अथवा भाषा-शक्ती. तिच्यावर जिची सत्ता चालते ती वागीश्वरी.

म्हणून, वागेश्वरी / वाघेश्वरी/ वागिश्वरी ❌

- नेहा लिमये
(संदर्भ: शब्द चर्चा - मनोहर कुलकर्णी)



No comments: