Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ६४- अनागोंदी


अनागोंदी

अनागोंदी म्हणजे अव्यवस्थित, पोकळ (कारभार).


अनागोंदी हे कर्नाटकातल्या एका गावाचे नाव आहे. ते पूर्वी विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. तेथील राजाचा जमाखर्च ( विशेष करुन सणासुदीच्या दिवशी पूजा करायचा वगैरे) भरमसाट अशा कपोल-कल्पित रकमांचा केलेला असे. जमा-खर्चाचे आकडे बरेच फुगवून लिहिलेले असत; त्यावरून पोकळ कारभाराला हा शब्द रूढ झाला. असे पोकळ जमा-खर्च / कारभार पुष्कळ दरबारांत करत असत.

कानडीत 'अन' म्हणजे हत्ती आणि 'गोंदी' म्हणजे गल्ली. छोट्या गल्लीतून हत्ती जाऊ शकेल एवढी जागा आहे असे भासवणे तसेच जमा- खर्च फुगवून सांगणे असे हा शब्द सूचित करतो.

संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी

- नेहा लिमये



No comments: