Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९३- आविर्भाव , आविष्कार

आविर्भाव , आविष्कार

आविस् / आविर् हे संस्कृत शब्द प्रकटपणादर्शक आहेत. प्रकट, दिसणारा, अनुभवास येणारा असे अर्थ इथे अभिप्रेत आहेत.


आविर्भाव= आवि: (आविर्) + भू (भाव) = देखावा करणे, वरकरणी दाखवणे, आव आणणे.

उदा. आविर्भाव तर त्याने मोठा औदार्याचा आणला, पण प्रत्यक्षात एका कवडीचीही मदत केली नाही!

आविष्कार = आविस् + कृ (कार) = प्रकट करणे.

उदा. त्याने ज्या प्रकारे गायनकलेचा आविष्कार केला, त्याला तोड नव्हती.

याच शब्दांची रूपे आविर्भूत, आविष्कृत अशी होतात.

अविर्भाव, आवीर्भाव, अविष्कार, आवीष्कार, अविर्भूत, आवीर्भूत ,अविष्कृत, आवीष्कृत - ❌

-नेहा लिमये

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ. पां. कुलकर्णी)

No comments: