Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९८ -ऊहापोह

ऊहापोह

ऊहापोह हा एक सामासिक शब्द आहे. ऊह आणि अपोह या दोन शब्दांचा हा समास आहे. अपोह या शब्दाचेही अप-ऊह असे दोन घटक आहेत.

ऊह् या संस्कृत धातूचा अर्थ आहे, तर्क करणे, विचार करणे. त्यावरून तयार झालेले ऊह हे एक नाम आहे. तर्क, विचार हा त्याचा अर्थ.

अप ऊह म्हणजे तो तर्क, तो विचार बाजूला सारणारा दुसरा विचार.

म्हणजेच ऊहापोह या शब्दाचा अर्थ प्रथम एक विचार मांडून झाल्यावर त्याच्या विरोधातील दुसरा विचार मांडणे म्हणजेच साधकबाधक चर्चा करणे. ऊहापोह म्हणजे केवळ वेळ घालविणारी निरर्थक बडबड नव्हे.

उदा.एखाद्या सभेत एखाद्या विषयावर चर्चा करीत वेळ घालवून निर्णय लांबणीवर टाकण्याचा जर काही लोकांचा प्रयत्न चाललेला असेल, तर त्या वेळी अध्यक्ष त्रासून जातात आणि म्हणतात, ‘आता या विषयाचा ऊहापोह झाला तेवढा पुरे नाही का? तुम्ही ही चर्चा आवरती घेणार आहात की नाही?’


-नेहा लिमये



No comments: