Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९९ - ऐरण


ऐरण

तांब्यापितळेची भांडी घडवताना त्या-त्या धातूच्या भांड्याला आकार देण्यासाठी ते भांडे एका लाकडी ठोकळ्यावर घालून त्या भांड्यावर हातोडीने ठोके मारीत असतात आणि भांडे पुरे झाले की, ठोके मारणे बंद करून ते भांडे त्या ठोकळ्यावरून काढून घेतात. हा ठोकळा काही वेळा धातूचाही असू शकतो. त्या ठोकळ्याला म्हणतात ऐरण. त्या ऐरणीवर ते भांडे ठेवले म्हणजे सर्व बाजूंनी ठोकत ठोकत त्याला इष्ट आकार देता येतो.


एखादा प्रश्न ऐरणीवर आला आहे असे म्हटले, तर त्या प्रश्नाचा असा ठोकून ठोकून सर्वांगीण विचार होऊन त्यातून इष्ट ती फलप्राप्ती होण्याची शक्यता सूचित होते.

-नेहा लिमये
(संदर्भ: शब्द चर्चा- मनोहर कुलकर्णी)



No comments: