Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले #२९


रे

काही नाही, एवढंच सांगायचं होतं की  इथे पाऊस नुसता कोसळतोय, वाऱ्याने थैमान घातलंय, रस्ते पाण्याने भरलेत, दिवे गेलेत ...... आणि मिट्ट अंधारात मी एकटीच बसून राहिलीय. मेणबत्तीच्या प्रकाशात भिंतीवरची सावली अक्राळ- विक्राळ भासतेय मला. वाकुल्या दाखवते आहे; नुसती वाट बघत बस , दुसरं आहेच काय तुझ्या हातात ??

बुचाची फुलं निथळून निघालीयेत आणि अंगणात सडा पडतोच आहे...... वेडीवाकडी पसरलेली ती फुलं आणि मनात विखुरलेल्या तुझ्या आठवणी यात काही फरक जाणवत नाही.

हे सगळं फार फार अंगावर येतंय रे.... .. 

बस्स, अजून किती वेळा मी ही वादळं सहन करायची आणि उन्मळून जाण्यापासून स्वतःला सावरायचं ते सांग एकदा.....!!!

- वादळात सापडलेली (मी)

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: