Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९२ - डबघाई

डबघाई

डबघाई हा शब्द "डफघाई" शब्दावरून आला आहे. डफावर म्हटले जात असलेले गाणे संपत आले म्हणजे म्हणणारा घाईने डफ वाजवतो यावरून 'समाप्तीचा काळ आला' किंवा 'शेवटाच्या जवळजवळची नष्टप्राय स्थिती.


डबघाईला/ डबघाईस येणे म्हणजे उतरती कळा लागणे; अंत होण्याचा समय जवळ येणे.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश - कृ. पां. कुलकर्णी आणि विस्तारीत शब्दरत्नाकर - वा. गो. आपटे)


ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांनी या संदर्भात दिलेली माहिती -

नेहा, आणखी एक गंमत सांगतो. मी मातंगावरची वारूळ ह्या कादंबरी साठी संदर्भ जमा करत असताना मला मिळालेली माहिती अशी-मातंग डफडं वाजवण्यात खूप वस्ताद असतात. ते डफड्यावर छत्तीस धाई (घाईसदृश्य शब्द) वाजवतात. म्हणजे वेगवेगळ्या छत्तीस प्रकारांनी डफडं वाजवू शकतात. घाई आणि धाई दोन्ही शब्द डफड्याशी संबंधित आहेत.

- नेहा लिमये

No comments: