Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९७ -आततायी


आततायी


‘इतकी आततायी वृत्ती चांगली नाही!’ असे एखादे वाक्य आपल्या द्वाड मुलाला किंवा नातवाला उद्देशून आई-वडिलांनी अथवा आजोबा-आजीने उच्चारलेले आपण ऐकले असेल. आततायी या शब्दाचा अविचारीपणाने दांडगाई करीत, नासधूस करणारा एवढाच मर्यादित अर्थ इथे अभिप्रेत असतो.


हा शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आलेला आहे.

संस्कृत भाषेत या शब्दाचे स्पष्टीकरण असे आहे –
अग्निदो गरदश् चैव शस्त्रोन्मत्तो धनापह:।
क्षेत्रदारहरश् चैतान् षड् विद्याद् आततायिन:।।

आग लावणारा, विषप्रयोग करणारा, उन्मतपणे शस्त्र चालविणारा, धनाचे, भूमीचे, स्त्रियांचे अपहरण करणारा अशा सहा प्रकारच्या माणसांना आततायी असे जाणावे.

या अर्थाने अतिरेकी शस्त्र-उन्मत्त असतात त्यांना आततायी म्हणता येईल, पण केवळ दांडगाई करणाऱ्या लहान मुलांना आततायी म्हणणे खरे तर बरोबर ठरणार नाही.

-नेहा लिमये
(संदर्भ: शब्द-चर्चा, मनोहर कुलकर्णी)


No comments: