Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ९४ -उच्छृंखल

उच्छृंखल

‘तुझं हे उच्छृंखल वर्तन मला अजिबात पसंत नाही.’ असं एखादं वाक्य ऐकणाऱ्या व्यक्तीला समजतं की, आपल्या वर्तनात या बोलणाऱ्या व्यक्तीला काहीतरी आक्षेपार्ह वाटत आहे!


शृंखला म्हणजे साखळी, बंधन. सर्वसाधारणपणे वर्तनासाठी जे काही समाजमान्य नियम, म्हणजे बंधने असतात, ती मनुष्याला इकडे तिकडे भरकटू देत नाहीत. ‘उत्’ हा उपसर्ग मर्यादा ओलांडण्याचा अर्थ देतो.

उद्बोध, उद्धार, उद्देश, उद्दिष्ट अशा अनेक शब्दांमध्ये त्याचा वापर झालेला आहे. उत्-शृंखल म्हणजे शृंखलेला ओलांडणारे. हे दोन्ही शब्द एकत्र आल्यानंतर हा शब्द आणि त्याचा उच्चार उच्छृंखल असा होतो.

-नेहा लिमये
(संदर्भ: शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी)


No comments: