Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ६५- उपहास आणि उपरोध


उपहास आणि उपरोध

उप हा संस्कृत उपसर्ग आहे आणि याचे जवळ, अधिक, कमी, उणा, दुय्यम, शेवट, विकार, समूह असे अर्थ होतात.


उपहास - उप+ हस् (हसणे) - हसण्या-हसण्यात एखाद्याच्या व्यंगावर बोट ठेवून घेतलेली मजा, चेष्टा करणे, खिल्ली/टर उडवणे

उदा. मयसभेत दुर्योधन पाय घसरून पडल्यावर द्रौपदी जोरात हसली आणि तिने दुर्योधनाला उद्देशून "आंधळ्याचा मुलगाही आंधळाच" असे उपहासात्मक बोल सुनावले.

उपरोध - उप + रूध् (रोधणे/ रोखणे) - एखाद्या गोष्टीत अडथळा आणणे, विरोध करणे

उपरोध हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. जसे-

१. लागेल असे टोचून बोलणे, आडून, घालून पाडून बोलणे, छद्मी भाषण
उदा. प्रत्येक ठिकाणी 'सरकून घेणे' हे मुंबई महानगरीची गरज झाली आहे. यात 'सरकून घेणे' हे 'खूप गर्दी आहे' याचे उपरोधिक रूप आहे.

२. अडचण, अडथळा, जुलूम, त्रास
उदा. गावाजवळ सैन्य उतरले तर ग्रामस्थांना उपरोध होईल.

३. भीड, शंका, संकोच
उदा. तुका म्हणे रखुमाईच्या वरा , उपरोध का धरा माझा आता
(तुकाराम गाथा)

- नेहा लिमये

टीप : उपरोधिक बोलणे म्हणजे sarcasam, उपहासात्मक बोलणे म्हणजे ridicule

No comments: