व्यतीत/ व्यथित
व्यतीत :
व्यतीत म्हणजे निघून गेलेला, मागे पडलेला. हा शब्द वि-अति-इ अशा तीन घटकांचा मिळून बनलेला आहे. इ धातूचा अर्थ आहे जाणे. अति म्हणजे पलीकडे आणि वि म्हणजे विशेषत:. ‘त्याने आपले सारे बालपण विविध कलांच्या साधनेत व्यतीत केले.’ अशासारख्या वाक्यात या शब्दाचा योग्य प्रकारे उपयोग केलेला आढळतो. ‘व्यतीत’ हा शब्द ‘व्यतित’ असाही लिहिणे योग्य नाही.
प्रारंभीचा वि काढून टाकला, तर राहाणारा अतीत हा शब्दही भाषेत वापरण्यात येतच असतो.
व्यथित :
‘व्यथित अंत:करणाने त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला!’ यात व्यथित होणे म्हणजे व्यथायुक्त होणे आणि व्यथा म्हणजे दु:ख. तेव्हा व्यथित म्हणजे दु:खी, खिन्न.
‘व्यथित’ या शब्दाचा ‘व्यतीत’ या शब्दाच्या ऐवजी कधी उपयोग करता कामा नये. त्याचप्रमाणे व्यतीत या शब्दाचा व्यथित या शब्दाऐवजी!
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment