Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ६८- चारी मुक्ती


चारी मुक्ती

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।


या चरणामधल्या "चार मुक्ती" म्हणजे सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य.

देवाचा लोक मिळणे म्हणजेच परमेश्वराचा निवास आहे त्या वैकुंठ लोकात भक्ताला जायला मिळते, ती त्याची सलोकता.

देवाजवळ जायला मिळणे म्हणजे समीपता.

देवासारखे रूप प्राप्त होणे म्हणजे सरूपता.

आणि अखेरची मुक्ती म्हणजे सायुज्य म्हणजेच जोडणे. स्वत:चे वेगळे अस्तित्व संपवून भक्त जेव्हा त्या ईश्वरामध्ये पूर्णपणे मिसळून जातो तेव्हा ती असते त्याची सायुज्य अवस्था.

पहिल्या तीन मुक्तींमध्ये भक्त ईश्वराहून वेगळा असतो. शेवटच्या सायुज्य अवस्थेत तो वेगळा उरतच नाही.

- नेहा लिमये

No comments: