Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७७ - मोक्ष/मुक्ती


मोक्ष/मुक्ती

स्वतंत्रता भगवतीचे स्तोत्र गाताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेले आहे, ‘मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे!’ या ओळीत मोक्ष आणि मुक्ती हे दोन शब्द आले आहेत आणि वरवर पाहाता ते एकाच अर्थाचे दिसतात परंतु ते वेगळे आहेत.


मोक्ष म्हणजे सुटका. जन्ममरणांच्या चक्रातून सुटका. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा न लागणे म्हणजे मोक्ष.

मुक्तीचा विचार करताना या ठिकाणी ‘चारी मुक्ती’ ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. त्या चार मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य. या चारही मुक्तींचा संबंध देवाशी / परमेश्वराशी समीपतेचा आहे. म्हणजेच इथे पुनर्जन्मातून सुटकेचा विषय नसून देवता संपर्क महत्त्वाचा आहे.

‘मोक्ष’ ही संकल्पना कोणत्याही देवता-विशेषाशी संबंधित नाही! म्हणून हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. यावरून सावरकरांनी किती सखोल विचार करून हे दोन्ही शब्द योजले होते हे देखील लक्षात येते.

- नेहा लिमये


No comments: