Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७६ - मल्लीनाथी करणे


मल्लीनाथी करणे


कुणाच्या लेखनावर अथवा भाषणावर केलेल्या टीकेला काही वेळा मल्लीनाथी म्हटले जाते. या शब्दातून थोडी तिरस्काराची भावना व्यक्त केली जात असते. कारण अशी टीका करणाराला म्हटले जाते, ‘तुझी मल्लीनाथी आता पुरे कर!'

मल्लीनाथ नावाचा एक प्रख्यात संस्कृत टीकाकार होता. त्याने कालिदासाच्या रघुवंशादी संस्कृत काव्य ग्रंथांवर स्पष्टीकरणात्मक विस्तृत टीका लिहिलेल्या आहेत. या टीकांच्या साहाय्याने हे ग्रंथ समजून घेणे खूपच सोपे होते. परंतु मल्लीनाथाने रसास्वादन पद्धतीने टीका लिहिलेली नसल्याने मल्लीनाथी म्हणजे कोरडी टीका, कोरडे स्पष्टीकरण, असा अर्थ रूढ झाला.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी)

- नेहा लिमये


No comments: