Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७५ -चांदरात


चांदरात


संस्कृत शब्द चांद्ररात्री असा आहे परंतु चांदरात हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे असे मानतात.


पूर्वी मुसलमानी राजवटीत मोबदला (मुशाहिरा) वाटण्याचे निरनिराळे दिवस ठरविले जात. रोजमरा (दररोज), आठवडा किंवा महिना अशा मुदती असत व त्या त्या मुदतीप्रमाणे वाटल्या जाणाऱ्या पगाराला नाव असे. महिन्याचा पगार जय दिवशी चंद्र दिसे म्हणजे द्वितीयेस वाटत, म्हणून त्याला चांदरात म्हणत. यावरून पगाराचा दिवस म्हणजे चांदरात असे सामान्यरित्या नाव पडले.

(संदर्भ- मराठी व्युत्पत्ति कोश, कृ पां कुलकर्णी)

- नेहा लिमये


No comments: