बीमोड
‘कुणाही सेनाधिकाऱ्याने कधीही शत्रुपक्षाचा पूर्ण बीमोड झाल्याशिवाय स्वस्थ बसणे योग्य होणार नाही.’ या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे.
शत्रुपक्षाचा बीमोड करणे म्हणजे त्याचा पूर्ण नि:पात करणे, पूर्ण नाश करणे. हा नाश केवळ नाश नसतो, तर ज्या वस्तूचा अथवा गोष्टीचा नाश करावयाचा ती वस्तू वा गोष्ट पुन्हा निर्माणच होणार नाही, अशी व्यवस्था करून तो नाश करावयाचा असतो. तरच त्याला बीमोड म्हणता येईल. बीमोड हा शब्द खरे तर वनस्पतींच्या संबंधात मुळात वापरता येईल. बी म्हणजे बीज. तेही नाहीसे करणे म्हणजेच ती वनस्पती पुन्हा उगवूच शकणार नाही, असे करणे, म्हणजे बी-मोड करणे! मुळातूनच एखादी गोष्ट उखडून टाकणे, ती पुन्हा दिसणारी नाही, असे करणे, या अर्थाने अनेक क्षेत्रात बीमोड हा शब्द वापरला जातो. हा शब्द ‘बिमोड’ असा न लिहिता ‘बीमोड’ असा लिहिला की त्याचा अर्थ नीट लक्षात येईल.
-नेहा लिमये
(संदर्भ: शब्दचर्चा, मनोहर कुलकर्णी)

No comments:
Post a Comment