Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७०- तारांबळ


तारांबळ

तारांबळ हा शब्द 'ताराबलं' या संस्कृत शब्दावरून आला असावा असे मानले जाते.

विवाहाच्या वेळी शुभ मुहूर्त म्हणून तारकांचे बल पाहतात. मंगलाष्टके म्हणून झाल्यावर "तदेव लग्नम् सुदीनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव" हा संस्कृत श्लोक म्हणतात. हा म्हणताना भटजींची फार त्वरा म्हणजे घाई होते व ताराबल (मुहूर्त) साधण्यासाठी ते अत्यंत घाई-गडबड करतात, त्यावरून घाई, धांदल उडणे यासाठी 'तारांबळ' असा शब्द रूढ झाला.

(संदर्भ - मराठी व्युत्पत्ति कोश, कृ पां कुलकर्णी)

- नेहा लिमये


No comments: