Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७२- पंचप्राण

पंचप्राण

'पंचप्राण डोळ्यांत आणून ती त्याची वाट बघत होती' यात पंचप्राण हा शब्दप्रयोग आहे.


प्राण म्हणजे वायू. त्याचे ५ प्रकार आणि ५ उपप्रकार मानले आहेत-

पंचप्राण - मुख्य प्रकार- प्राण, अपान, व्यान, उदान, समान

१. प्राण :- हा वायू हृदयात राहतो व श्वासोच्छ्वास करतो.
२ अपान :- हा वायू मोठय़ा आतडय़ात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो.
३. व्यान :- हा सर्व शरीर व्यापून राहतो.
४. उदान :- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.
५. समान :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवतो.

उपप्राण - नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय

१. नाग :- हा वायू ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्त्वे बाहेर टाकतो.
२. कूर्म :- हा वायू पापण्यांची उघडझाप करतो.
३. कृकल :- हा वायू शिंक व खोकला निर्माण करतो.
४. देवदत्त :- हा वायू जांभई निर्माण करतो.
५. धनंजय :- हा वायू मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील पिशाच्चे शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतो.


नैवद्य दाखवताना पंचप्राणांचा उल्लेख का होत असावा ?

हे सगळे वायू जठराग्नीचे उद्दीपन करतात आणि संतुलन राखतात. नैवेद्यातल्या पदार्थांचे सगळे रस आणि हे प्राण यांना न्याय दिला जावा हे सूत्र असावे. मूर्तीत जणू काही या पंचप्राणांचा शिरकाव झाला आहे असे मानून, त्या वायूंना नैवेद्य ग्रहण करण्याचे आवाहन , हा सांकेतिक संदेश.
- नेहा लिमये

No comments: