Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८४- साद्यंत


साद्यंत

साद्यंत = स + आदि + अंत


सादि-अंत यांचा समास होताना ‘सादि'मधील ‘इ’ आणि ‘अंत'मधील ‘अ’ या दोन स्वरांचा संधी होतो. म्हणजेच ते दोन स्वर एकत्र, एकदम उच्चारले जातात. इ+अ मिळून य हा उच्चार होत असतो. म्हणून सादि+अंत यांचे एकत्रीकरण साद्यंत असे होते. या सामासिक शब्दाचा अर्थ आहे, ‘आदि’सह अंत. म्हणजे प्रारंभापासून तो अखेरपर्यंत. त्यामुळे कुठल्याही संपूर्ण हकीगतीला साद्यंत हकीगत असे म्हणतात. सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत सांगितलेला कोणताही भाग हा साद्यंत म्हणता येईल.

साध्यंत, साद्धंत असे या शब्दाचे वेगवेगळे उच्चार ऐकिवात आहेत, हे उच्चार चुकीचे आहेत.

- नेहा लिमये
(संदर्भ: शब्द चर्चा, मनोहर कुलकर्णी )


टीप - स्वरसंधीचा एक प्रकार --'यणादेश' -- इ/ई या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास इ/ई चा य् होतो.

No comments: