Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७९ - घबाड


घबाड

घबाड मुहूर्ताची एक विशिष्ट गणना आहे. सूर्यनक्षत्रापासून चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रे मोजून त्याला तिनाने गुणून त्या गुणकारात चालू तिथी मिळवून आलेल्या संख्येला सातने भागून तीन उरल्यास त्या दिवशी हा योग येतो. या शुभ मुहूर्तावर कार्य केल्याने फल प्राप्ती होते.


त्यावरून अचानक रीतीने प्राप्त झालेला लाभ, असा अर्थ रूढ झाला.

(संदर्भ : मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी)



No comments: