Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८१ - संख्या/ अल्पसंख्याक/ बहुसंख्याक


संख्या/ अल्पसंख्याक/ बहुसंख्याक

संख्या= सम् + ख्या = एकत्र सांगणे, मोजणे, त्यावरून अंक मोजण्याचे साधन


अल्पसंख्याक/ बहुसंख्याक = अल्प/ बहु+ संख्या + क= जे संख्येने कमी (अल्प) किंवा जास्त (बहु) आहे ते

यात 'क' हा प्रत्यय आहे , 'अंक' नाही. त्यामुळे अल्पसंख्यांक / बहुसंख्यांक लिहिणे बरोबर नाही. 'क' हा प्रत्यय गुणदर्शक किंवा वैशिष्ट्यदर्शक आहे - जसे , भेदक, मोहक.

तसेच, अल्पसंख्याक / बहुसंख्याक ही विशेषणे जेव्हा नाम म्हणून वापरली जातात तेव्हा त्यांचे प्रथम समान्यरुप होते आणि मग -अल्पसंख्याकांना किंवा बहुसंख्याकांसाठी अशी रूपे होतात. यात 'ख्या' वर अनुस्वार देऊ नये. म्हणजेच, अल्पसंख्यांकांना/ बहुसंख्यांकांसाठी हे चुकीचे लिखाण आहे.

(संदर्भ - मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी आणि मराठी लेखन कोश - अरुण फडके)

-नेहा लिमये



No comments: