Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८०- सामग्री/ सामुग्री


सामग्री / सामुग्री

समग्र या शब्दाला ई हा प्रत्यय लागतो आणि त्याची वृद्धी होऊन स चा सा होतो. तसेच यात समग्र आणि ई यामध्ये पररूप संधी होतो. म्हणजेच ग्र ची ग्री होते. यात म चे मु होण्याचे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. म्हणून सामग्री योग्य, सामुग्री नाही.


जसे - जनक - जानकी (जानुकी नव्हे), मनस- मानसी (मानुसी नव्हे).

याप्रमाणे यंत्रसामग्री, शिधासामग्री, साधनसामग्री हे योग्य लेखन.

(संदर्भ- मराठी लेखन कोश- अरुण फडके)

-नेहा लिमये



No comments: