Search This Blog

Thursday, October 25, 2018

#मराठीभाषा २७ - 'एखादा, एखादी, एखादे'


एखादा हा शब्द 'एकार्धया शब्दाचे रूपांतर आहे

'एक , अर्धम्हणजे एकापेक्षा थोडे जास्त
याच अर्थाने आपण 'एखाद-दुसराअसे म्हणतोकारण आपल्या मनात तेव्हा काहीतरी संख्या असते

'एकार्धमधला र्ध हा ''कारयुक्त आहे आणि त्याचेच रूपांतर 'मध्ये होते

म्हणून 'एखादा', 'एखादी', 'एखादेहे योग्य आणि 'एकादा', 'एकादी' , 'एकादेअयोग्य.

नेहा लिमये 


#मराठी भाषा २६ - सव्यापसव्य

सव्यापसव्य करणे/ होणे = खटपट/ यातायात करावी लागणे

दशक्रिया विधीच्या वेळी जानवे/ उपरणे डावीकडून उजवीकडे करावयास सांगतात. जानवे/उपरणे डाव्या खांद्यावरुन उजव्या बगलेखालून काढणे म्हणजे 'सव्य' आणि उजव्या खांद्यावरुन डाव्या बगलेखालून काढणे म्हणजे 'अपसव्य'. ही कृती अनेकदा करायला लागली की कंटाळवाणी होते.

तसेच एखादी योजना बदलून आधी ठरवल्याच्या उलट करावे लागणे आणि काही काळाने तेही बदलून पूर्वपदावर यावे लागणे म्हणजेच एखादी योजना तडीस नेण्यासाठी खूप यातायात/ खटपट करावी लागणे या अर्थी 'सव्यापसव्य' शब्द वापरतात.

- नेहा लिमये 

(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी , मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी )

#मराठी भाषा २५- शब्दयोगी अव्यये आणि 'वेळी'


शब्दयोगी अव्यये साधारणतः जोडून लिहिली जातात- झाडाखाली, घरावर तरीपण, काहीतरी, वगैरे. पण  मूळ शब्दाचे सामान्यरुप आल्यास तोडून लिहिली जातात - झाडाच्या खाली, घराच्या वर, वगैरे

परंतु 'वेळी' हे 'देखील', 'पण' , 'सुद्धा' सारखे शब्दयोगी अव्यय नव्हे. वेळ हे नाम आहे त्यामुळे हे पद विकारी आहे आणि त्यात बदल होऊ शकतात. त्याचा व्यय होतो म्हणून हे शब्दयोगी अव्यय नाही

त्यामुळे 'ज्या वेळी' ,' त्या वेळी, अशा वेळी' असे लिहावे

'ज्यावेळी, त्यावेळी, अशावेळी' असे जोडून लिहू नये.

- नेहा लिमये 


#मराठीभाषा २४ - सुश्रुत, बहुश्रुत


सुश्रुत = ज्याबद्दल सु (चांगले) + श्रुत (ऐकणे, ऐकले आहे असा) = 'प्रसिद्ध', 'लोकप्रिय' असलेला

जसे - संतांची सुश्रुत वाणी, सुश्रुत रचना 

सुश्रुत ऋषी हे शल्य चिकित्सेचे जनक मानले जातात.

बहुश्रुत = बहु (खूप) + श्रुत (ऐकणे)

खूप विषयांचे स्मरण ठेवणारा, त्यावर पकड असणारा असा विद्वान, पंडित.

- नेहा लिमये 

#मराठीभाषा २३ - 'म' पूर्वी सानुस्वार अक्षराचे शब्द


शब्दातील मधल्या '' च्या आधी सानुस्वार अक्षर असेल, तर सामान्यरुप करताना त्या अक्षरावर अनुस्वार देऊ नये.
अंमल - अमलात
गंमत- गमतीने
किंमत- किमतीचा
अंमलात/ गंमतीने/ किंमतीचा - असे लिहिणे टाळावे.

अपवाद - हिंमत - हिमतीने , संमत -संमतीने 


- नेहा लिमये 

#मराठभाषा २२- 'सा' कारान्त आणि 'शा'कारान्त शब्द


शुद्धलेखन नियम :- शब्दाचा शेवट "सा" ने होत असल्यास सामान्यरूपाच्या वेळी "शा" होते.

महामंडळाचा नियम -8.4 --पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ' साअसल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शाहोतो('श्याहोत नाही).
तात्पर्य - सा-कारान्त पुल्लिंगी शब्दांची एकवचनी आणि अनेकवचनी सामान्यरूपे केवळ 
शा-कारान्त करावीतश्या-कारान्त करू नयेत


अपवाद - नकाशा.


त्याचप्रमाणे शी-कारान्त स्त्रीलिंगी नामांची अनेकवचनेही श्या-कारान्त करावीत.

जसे - घसा- घशात, मासा - माशाचा, ससा- सशाने
यात "शा" होतो, "श्या" होत नाही हे लक्षात घ्यायला हवे.  सश्यांचा, माश्यांचा हे चुकते.

अपवाद - आदिवासी - आदिवासींच्या, आदिवासीने  

मात्र शा-कारान्त पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे श्या-कारान्त करावीत.

उदा. - ठुशी - ठुश्यांचा 

-नेहा लिमये 
(संदर्भ : मार्गप्रदीप - अरुण फडके ) 





#मराठीभाषा २१-लघुतम , महत्तम



महत्तम = महत् + तम = सर्वात मोठा 
[यात चे द्वित्व होते]

लघुतम = सर्वात लहान [यात चे द्वित्व होत नाही]
त्यामुळे 'लघुत्तम' हे 'महत्तम' सारखे लिहिणे टाळावे.


- नेहा लिमये


#मराठीभाषा २०- विसर्ग शब्द


विसर्ग नसलेले शब्द

अंधकार, अंधश्रद्धा, निस्तेज, घनश्याम, हाहाकार, धिक्कार

विसर्ग असलेले शब्द

स्वतः, विशेषतः, नि:स्पृह, नि:सत्व, अध:पात, तेज:पुंज, नि:श्वास, नि:संशय, नि:शेष, प्रात:काल, :पदार्थ


- नेहा लिमये


#मराठीभाषा १९- परोक्ष / अपरोक्ष


परोक्ष = पर + अक्ष = दुसऱ्याच्या नजरेसमोर म्हणजे आपल्या दृष्टीआड

म्हणजेच,

अपरोक्ष = + परोक्ष = दुसऱ्याच्या दृष्टीआड म्हणजे आपल्या नजरेसमोर - असे होईल.

पण मराठीत दोन्ही शब्द एकाच अर्थाने म्हणजे 'दृष्टीआड' या अर्थी वापरले जातात.

- नेहा लिमये 


#मराठीभाषा १८ - त्र


'त्र' हा प्रत्यय काहीवेळा  'ठिकाणी' या अर्थी वापरला जातो
जसे - एकत्र, अन्यत्र, सर्वत्र, इतरत्र
'सर्वत्र' म्हणजे सगळीकडे, 'सर्व' अशा अर्थाने नाही

उदा.सर्वत्रानी' फराळाला यावे. - हे चुकीचे

'
सर्वांनी' फराळाला यावे. - हे बरोबर

- नेहा लिमये