वाटाण्याच्या अक्षता लावणे
अक्षत = अ + क्षत = पूर्ण / अखंड .
न तुटलेले (म्हणजेच अखंड) असे धान्य (मुख्यतः तांदूळ) देऊन आमंत्रण देत असत; म्हणून 'मंगल अक्षता/अक्षदा डोक्यावर टाकणे, अक्षत पडणे, अक्षत देणे ' हे वाक्प्रचार रूढ
झाले आहेत.
अक्षता कपाळी लावलेल्या गंधात लावून मग डोक्यावर टाकण्याची
पद्धत आहे. या प्रक्रियेत गंधावर
काही अक्षताचे दाणे चिकटून राहतात. वाटाणे अक्षता म्हणून वापरल्यास ते डोक्याला अजिबातच
चिकटणार नाहीत. यावरून वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणे साफ नाकारणे, विनंती अमान्य करणे असा अर्थ रूढ झाला.
भिजत घोंगडे (/कांबळे) ठेवणे/पडणे
पंढरपुरात आषाढी यात्रेत घोंगडे चांगले मिळत.बहुतेक लोक तेथूनच आणत. कांबळे किंवा घोंगडे मेंढीच्या केसांचे (लोकरीचे) असल्याने ते फार वेळ पाण्यात ठेवले तरच भिजते; अन्यथा नाही. पाण्यातून बाहेर काढून त्याला फटकले की झाले कोरडे. त्यामुळे जुन्या जमान्यात शेतकरी पावसात फिरताना त्याचा घोंगता करून अंगावर घेत. थंडीत ते अंगावर पांघरले की रजईसारखे उबदार होत असे. यावरून लाक्षणिक अर्थ असा की एखादी गोष्ट निकालास न लागता तशीच पडून राहणे किंवा कोणतेही काम तडीस न लागता लांबणीवर पडणे.
त्रिशंकू
विधानसभा, लोकसभा किंवा अगदी नगरपालिका सुद्धा या लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने चालणाऱ्या संस्थांमध्ये राजकीय अथवा अन्यही आधाराने प्रतिनिधींची जी निवड होते, त्यात एखाद्या विशिष्ट गटाला, पक्षाला वा समूहाला ‘बहुमत’ प्राप्त झाले नसेल, तर अशा वेळी विधानसभा इत्यादीचे वर्णन ‘त्रिशंकू’ या शब्दाने केले जात असते.
‘त्रिशंकू म्हणजे ना धड इकडे अन् ना धड तिकडे अशी मधेच लटकणारी’ हा अर्थ सर्वांना समजतो. परंतु हा शब्द आला कसा हे जाणून घेणे रंजक आहे. याविषयी एक दंतकथा सांगतात ती अशी-
निबंधन
नावाच्या
राजाचा
सत्यव्रत
नावाचा
एक
पुत्र
होता.
वसिष्ठ
ऋषींनी
त्याला
गोवधाच्या
दोषासाठी
शाप
दिला
होता
की,
तुझ्या
डोक्यावर
तीन
शंकू
(टेंगळे)
येतील.
म्हणून
त्याचे
नाव
पडले
त्रिशंकू!
त्याने
सदेह
स्वर्गाला
जाण्यासाठी
विश्वामित्रांची
मदत
घेतली,
परंतु
सर्व
देव
आणि
इंद्र
यांनी
त्याला
वाटेत
रोखले.
त्यामुळे
त्याची
अवस्था
धड
ना
भूलोकात
ना
स्वर्गात
अशी
झाली!
त्याच्या
या
अवस्थेलाच
पुढे
भाषेत
‘त्रिशंकू
अवस्था’
असे
म्हणू
लागले.
संदर्भ - शब्दचर्चा - मनोहर कुलकर्णी
लेखन आणि संकलन - नेहा लिमये
No comments:
Post a Comment