छोट्या दोस्तांनो,
'इन मीन तीनच लोक तर होते दुकानात , काहीच गर्दी नव्हती आज, त्यामुळे पटकन काम झालं.' असं मोठी माणसं बोलत असताना तुम्ही ऐकलं असेल ना? मग यातलं इन मीन तीन म्हणजे काय हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला. तर आज याचा अर्थ समजून घेऊ.
यातला इ = ही म्हणजे बायको.
न
= आणि.
मी =
आपण
स्वतः.
न
= आणि
ती =
मुलगी.
आता या सगळ्याची बेरीज केली तर आपल्याला मी, बायको आणि मुलगी असे उत्तर मिळते. म्हणजेच इन मीन तीन म्हणजे अगदी छोटे कुटुंब किंवा अगदी छोटी संख्या.
पूर्वीच्या काळी म्हणजे आजी-आजोबा इन मीन सव्वातीन म्हणत असत. यात सव्वाची फोड परत स = तो मुलगा, वा = किंवा ती = मुलगी म्हणजेच मी, बायको आणि मुलगा/ मुलगी अशी होत असे. इथे दोन मोठी माणसे आणि २ लहान मुले म्हणजे खरेतर चार पण लहान मुलांना अर्धेच धरले जाते म्हणून सव्वातीन म्हणजे तीनपेक्षा जरासंच जास्त असे सांगायचे असते.
एकूणच जिथे खूप कमी माणसे असतील तेव्हा इन मीन तीन असे म्हणायची पद्धत आहे. एखाद्या कार्यक्रमाला इन मीन तीनच जण जमलेत म्हणजे खूपच कमी माणसे आली आहेत असे म्हणायचे असते.
मग आता तुम्हीही आजी आजोबांशी बोलताना किंवा आई बाबांना सांगताना हे वापरून पाहा. जमेल ना?
- नेहा लिमये
अंकाची लिंक -
https://shikshanvivek.com//Encyc/2020/5/11/shikshanvivek-sutti-visheshanka-e-ank-.aspx
No comments:
Post a Comment